न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- आजूबाजूला कोणी नाही हे पाहून महिलेचा हात पकडून तिला जवळ ओढले. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला.
तसेच “माझेशी लग्न कर, माझेशी बोल, नाही तर तुला सोडणार नाही” अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. विरोध केला असता उजव्या पायाच्या गुडघ्याखाली, तसेच पाठीवर व पोटात लाथाबुक्याने मारुन आरोपी पळून गेला, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. १९) रात्री ११.३० वा. दापोडी वर्क शॉप मागे, दापोडी येथे रोडवर घडली.
याबाबत पिडीत महिलेने योगेश राजू गुंठे (रा. ममतानगर गल्ली नं. ३, पिंपळे गुरव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४९८/२०२४, भारतीस न्याय संहिता २०२३ चेकलम ७४, ७८, ११५ (२), ३५२, ३५१(२) (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मदेवाड तपास करीत आहेत.














