न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- भोसरीतील धावडेवस्ती येथील न्यू गणेश ज्वेलर्स दुकानात (दि. १८) रोजी सायं ५.३० ते ७.०० च्या दरम्यान ३ अनोळखी महीला व २ अनोळखी पुरुष हे मंगळसुत्राबाबत चौकशी करण्यासाठी आले होते.
त्यांना कामगार कालूसिंग जोगसिंग जोधा हे मंगळसुत्र दाखवत होते. दुसरे मंगळसुत्र दाखविण्यासाठी मागे वळाले असता आलेल्या २ महीलांपैकी एक महीलेने कॅरेटमध्ये ठेवलेले १३.४३० ग्रॅम वजनाचे ९८,७६६ रुपये किंमतीचे मंगळसुत्र काढून चोरुन मागे असलेल्या दुस-या महीलेकडे दिले. दुकानात असलेल्या सि.सि.टी.व्हि कॅमेरामध्ये ते दिसले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी सोहनसिंग जब्बरसिंग देवडा (वय ४२ वर्षे, धंदा सोन्या चांदीचे दुकान) यांनी आरोपी पाच अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. भोसरी पोलिसांनी ४९७ /२०२४, भारतीयन्याय संहिता २०२३ चे कलमः ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जोनापल्ले तपास करीत आहेत.














