न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- चिंचवडच्या बजाज फायनन्स कंपनी येथील ऑफिसमधुन (दि. १९/०६/२०२४ ते दि १४/०८/२०२४) दरम्यान सात व्यवसायिकांनी घेतलेल्या ईडीसी डिव्हाईस मशीनव्दारे वेगवेगळया डेबिट कार्डवरुन ट्रान्झेक्शन केले. स्वतःच्या बँक अकाऊंटला एकुण ७७,२७,८६६ रुपये स्विकारले. स्विकारलेल्या पैशाबाबत परत बँकेला चार्ज बँक रिक्वेस्ट टाकुन कंपनीची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय सिनीयर एरीया आर.सी.यु मॅनेजरने आरोपी १) आशापुरा ट्रेडर्स (मालक नौरतन सिंह, दुकान पत्ता दुकान नंबर ०३, भोईरे बिल्डींग आदर्श नगर बस स्टॉप काळेवाडी), २) परमेश्वर सुपर मार्केट (मालक नारायणला बी देवाशी ऊर्फ धलाराम दुकान पत्ता सर्व्हे नंबर ४०/१, गणपती मंदीराजवळ, नेरे दत्तवाडी, मुळशी), ३) बालाजी ट्रेडींग कंपनी (मालक प्रेमाराम दुकान पत्ता दुकान नंबर ०१ मुक्ताई माता मंदीर, मुक्ताई चौक), ४) राजेश्वर प्लायवुड हार्डवेअर अॅण्ड ईलेक्ट्रिक (मालक श्रीराम दुकान पत्ता दुकान नंबर ०१, मुंबई पुणे हायवे, कोयते वस्ती), ५) महालक्ष्मी मार्केटींग (मालक विशेक बिष्णोई दुकान पत्ता सर्व्हे नंबर १५६, ताथवडे मुळशी), ६) कमल सुपर मार्केट (मालक मनिष कुमार दुकान पत्ता- दुकान नंबर ०१ मुंबई पुणे महामार्ग कोयते वस्ती), ७) शिंगार कॉस्मेटीक अॅण्ड ईमिटेशन (मालक शेरुखान दुकान पत्ता योगीराज अपार्टमेंट दुकान क्रमांक ०२, सिंहगड रोड धायरी फाटा, पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी ३२९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६-डी नुसार सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि गोसावी तपास करीत आहेत.













