न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- देहू-चिखली रस्त्यावरील शेलारवस्ती येथील हॉटेल मार्तंड रात्री साडेअकराच्या सुमारास बंद करीत असताना दोघे जण तिथे आले. वेटरकडे जेवणाची मागणी केली. हॉटेल बंद झाले असुन जेवन संपले आहे तुम्ही येथून जा, असे वेटर त्या दोघांना म्हणाला. त्याचा राग आल्याने हॉटेलमधील इतर वेटर लोकांना दोघांनी शिवीगाळ करून हाताने मारहान केली.
हॉटेलमधील खूर्ची उचलून हॉटेल चालकाच्या पाठीत मारली. डाव्या हाताच्या दंडावर चावा घेवून दुखापत केली. हातातील मोबाईल घेऊन जमीनीवर आपटून नुकसान केले. त्या झटापटीत हॉटेल चालकाच्या गळयातील सोन्याची चैन पडून गहाळ झाली. ‘तु आमचे काही वाकडे करु शकत नाही. तुला कोठे जायचे तेथे जा, तुझे हॉटेल कसे चालते तेच पाहतो अशी धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २०) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. गोविंद दगडु सातपुते (वय ४२ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. ताम्हाणेवस्ती चिखली) यांनी १) पप्पू शेलार, २) वैभव शेलार (रा. शेलारवस्ती, चिखली) व त्यांच्या सोबत असणारे दोन इसम यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलीस ठाण्यात ४८०/२०२४, भारतीय न्यास संहिता २०२३, चे कलम ११७, ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि खारगे पुढील तपास करीत आहेत.













