न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- रहाटणीतील नखाते पेट्रोल पंपसमोरील ए वन फुटवेअर शॉपमध्ये दुकानातील कामगारांना दोघांनी शिवीगाळी व दमदाटी केली. दुकानातील ७०० रु. चप्पलच्या दोन जोड, ५०० रुपये किंमतीच्या शुजची एक जोड जबरदस्तीने घेऊन फिर्यादीच्या शर्टच्या वरच्या खिशातील १५०० रु. काढुन घेतले.
‘पोलीसात आमच्या विरुध्द तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही’, अशी धमकी दिली. दुकानासमोरील सिमेंटचे गड्ड उचलुन फिर्यादीचे व कामगाराच्या दिशेने फेकुन मारले. ते दगड दुकानाचे पाठीमागे उभी असलेल्या १) किया आणि स्विफ्ट या चार चाकी गाडीच्या काचेवर पडल्याने त्या दोन्ही गाडीच्या काचा फुटुन नुकसान केले. तसेच तेथे जमा झालेल्या लोकांच्या दिशेने दगड उगारुन मध्ये कोणी आले तर एका एकाला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यांच्या भितीने व दहशतीने लोक पळुन गेले. बाजुचे दुकानदारांनी भितीने दुकाने बंद केली. कारच्या काचा फोडून, नुकसान करुन भिती व दहशत निर्माण केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी सायं ७.१५ वा. चे सुमारास घडला. ताहीर जमील हसन (वय ४६ वर्षे धंदा चप्पल व्यवसाय रा. सांगवी) यांनी आरोपी १) शंतनु गायकवाड (वय-२२ वर्षे अंदाजे रा. किनारा कॉलनी रहाटणी), त्याचा साथीदार २) ऋषीकेश यादव (वय-२२ वर्षे अंदाजे रा. रहाटणी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ९१४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९, ११०, ३२४ (४), ३५१(२) (३), ३५२, ३(५) क्रि.लॉ. अमेंटमेंड कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी यांना अटक केली आहे. सचिन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत.














