न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२४) :- जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेतील १४ वर्षे वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धा आज संपन्न झाल्या. त्यानुसार या स्पर्धेत २३ किलो खालील वजनी गटात तेजस्विनी जाधव, २७ किलो खालील वजनी गटात श्रुती गोरे , ३२ किलो खालील वजनी गटात नूतन गावडे , ३६ किलो खालील वजनी गटात समृद्धी जाधव, ४० किलो खालील वजनी गटात सृष्टी यादव, ४४ किलो खालील वजनी गटात आराध्या आहेर , ४४ किलो वरील वजनी गटात पूर्वा कांबळे या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन कावेरीनगर क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. विविध वजनी गटात झालेल्या १४ वर्षाखालील मुलींच्या ज्युदो स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत २३ किलो खालील वजनी गटामधून एम.एम. विद्यामंदिरच्या तेजस्विनी जाधव, एस.डी. गणगे प्रशालेच्या दिशा पाटील यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तर एस.डी. गणगे प्रशालेच्या अस्मिता पवार आणि न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या अनघा जोशी यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
२७ किलो खालील वजनी गटात एस.डी. गणगे प्रशालेच्या श्रुती गोरे आणि एम.एम. विद्यामंदिरच्या प्रगती मोरे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच शाहूनगर येथील डी. वाय. पाटील शाळेच्या आराध्या बधे आणि महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या स्तुति साळवे हिला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
३२ किलो खालील वजनी गटात एस.डी. गणगे प्रशालेतील नूतन गावडे आणि एम.एम. विद्यामंदिरच्या प्रांजली गव्हाणे या दोन्ही खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तर अभिनव विद्यालयातील प्रियंका कारकर आणि एस.डी. गणगे प्रशालेच्या अनुजा मोरे या संयुक्तपणे तिस-या ठरल्या.
३६ किलो खालील वजनी गटात भारतीय जैन संघटनेच्या समृद्धी जाधव हीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून एस.डी. गणगे प्रशालेच्या स्नेहा गव्हाळे हीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर एम.एम. विद्यामंदिरच्या संस्कृती देवकाते आणि स्नेहल कलशेट्टी यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
४० किलो खालील वजनी गटातून एम.एम विद्यामंदिरची सृष्टी यादव प्रथम क्रमांक पटकावला. तर वैष्णवी हिप्परकर ही द्वितीय स्थानी राहिली. तसेच एस.डी. गणगे प्रशालेच्या प्रिया ढगोरे आणि भारतीय जैन संघटनेच्या सृष्टी साळवी यांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला.
४४ किलो खालील वजनी गटात सरस्वती विश्व विद्यालयाच्या आराध्या आहेर या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला. तर एस.डी. गणगे प्रशालेच्या ज्ञानेश्वरी सातपुते हिने द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या सानवी रानावडे आणि एस.डी. गणगे प्रशालेच्या श्रद्धा मसुरकर या खेळाडूंना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
४४ किलो वरील वजनी गटात एम.एम विद्यामंदिरच्या पूर्वा कांबळे , न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या वैदेही पांडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला तर एस.डी. गणगे प्रशालेच्या प्राप्ती कुंभार आणि एम.एम. विद्यामंदिरच्या हर्षदा शिंदे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.