न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- घरगुती कारणावरुन मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करुन विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत क्रूर वागणुक दिली. पती, सासु, तसेच सासरे यांनी लग्नामध्ये हुंडा दिला नाही आणि कामाला जात नाही म्हणुन वारंवार छळ केला. त्यावरून राहत्या घरी साडीच्या तुकडयाचे सहाय्याने घराच्या पत्र्याचे शेडच्या पाईपला गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली आहे. सर्व आरोपी आत्महत्या करण्यास प्रवृत्त ठरले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ०१ जानेवारी २०२२ पासुन ते दि.२३/०८/२०२४ दुपारी ३.०५ पर्यंत माटेगडी ता. निलंगा जिल्हा लातुर व झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर येथे घडला.
याप्रकरणी विवाहितेच्या आईने आरोपी १) रविंद्र गोपाळ वाघमारे, २) महिला आरोपी, ३) गोपाळ वाघमारे (रा. सर्व माटेगडी ता. निलंगा जिल्हा लातुर; किरायाने झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ३४४/२०२४ भा. न्या सहीता कलम १०८, ८०,८५,३(५),११५(२),३५२ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि ढगे तपास करीत आहेत.












