न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा ही भरधाव वेगाने, हयगयीने, निष्काळजीपणाने, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन जोरात चालवली. रोडवरील खड्डयात आपटुन रिक्षात बसलेली फिर्यादीची पत्नी रिक्षातुन रोडवर पडली. पत्नीच्या डोक्याला गंभीर जखमी करुन मृत्युस आरोपी रिक्षाचालक कारणीभुत झाला आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी सकाळी ७.०० वा. चे सुमारास थरमॅक्स चौकाजवळ, निगडी येथे घडला. याप्रकरणी गोविंद माधवराव कल्याणकर (वय ५३ वर्ष, धंदा सिक्युरीटी गार्ड) यांनी आरोपी रिक्षा नं. एम एच १४ सी यु ३२२३ ही वरील चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यावरून निगडी पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात ३७७/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम २८१, १०६ (२) व मो. वा.का १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि कदम तपास करीत आहेत.