- जलसंवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जुलै २०२६) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कॅच द रेन’ अभियानाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांना पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे.
‘जिथे पाऊस पडतो, तिथेच पाणी साठवूया’ या संकल्पनेवर आधारित या अभियानांतर्गत पर्जन्यजल संधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत जलव्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. घर, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करणे, जलस्रोतांची स्वच्छता व पुनर्भरण तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जलसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून लोकसहभागाशिवाय जलसुरक्षा शक्य नसल्याचे सांगितले. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनीही पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात जलसंवर्धनाची कामे हाती घेण्याचे आवाहन केले.

















