न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- पिंपरीतील डी. वाय. पाटिल हॉस्पीटल येथे पहिला मजल्यावरुन जिन्याने दुसऱ्या मजल्यावर आजोबासाठी जेवणाचा डब्बा घेवुन जात असताना डब्याचा धक्का दोघांपैकी एकाला लागला. त्यावरून त्यांनी तरुणाला शिवीगाळ करुन चापट मारली. त्यापैकी एकजण ” तु मला ओळखत नाही का, तु आम्हाला जाणुन बुजुन धक्का दिला आहेस, आम्ही आकुर्डीचे भाई आहोत, तुला आमची भिती नाही का, तुला आज जिवंत सोडत नाही” असे म्हणत चाकू तरुणाच्या गळयावर मारला.
तो वार चुकवल्याने नाकावर जोरात हातातील कोणत्यातरी वस्तुने बुक्का मारुन नाकाचे हाड फॅक्चर केले. तसेच दुसऱ्याने केसांना पकडुन गालावर जोरात त्याचा पायाचा गुडघा मारुन गालाचे हाड फॅक्चर करुन छातीत गुडघा मारला. त्यानंतर हातातील चाकु हवेत फिरवुन तेथे जमा झालेल्या लोकांकडे बघुन ”आम्ही भाई आहोत आमच्याशी जो नडेल त्याची अशी अवस्था करु” असे ते म्हणाले. जमलेले लोक तेथुन सैरावैरा पळु लागले. तरुणाला जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी पलायन केले. हा प्रकार (दि. २४) रात्री ०८.४० वा.च्या सुमारास घडला.
रोहित हिंदुराव रकटे (वय.२८ वर्षे) याने आरोपी १) रोहित ओव्हाळ, २) आदित्य यादव (दोघे रा. आकुर्डी)यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. पिंपरी पोलिसांनी ७४९ /२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ३५१ (२), ३ (५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ सह २५, क्रिमिनल लॉ अमेटमेंन्ट कलम ३ सह ७ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि आव्हाड पुढील तपास करीत आहेत.

















