न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगताना दोन इसम रहाटणी आणि पिंपळे गुरव परिसरात आढळले आहेत. याप्रकरणी वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान (दि २७) रोजी ००.०५ वा.चे सुमारास मोकळे मैदान, सुलभ कॉलनी, गजानन नगर, रहाटणी येथे वाकड पोलिसांनी कारवाई करीत गोरख प्रभु सातपुते (वय २९ वर्ष, रा. फिनीक्स हॉस्पीटलच्या बाजुला पवारनगर, थेरगाव) याला अटक केली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात त्याच्यावर ९३६/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधि ३७ (१) (३) सह १३५, १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि चव्हाण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
तर, दुसरी कारवाई (दि. २७) रोजी दुपारी ४.४५ वा चे सुमारास औंध जिल्हा आयुष रुग्णालयाचे समोर असलेले पाण्याचे टाकीजवळ, जुनी सांगवी येथे सांगवी पोलिसांनी केली. ओंकार किसन शिंगोरे (वय २४ वर्षे, रा. गांगार्डे नगर, लेन नं. २, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून २५,००० रु. किंमतीचे ०१ मॅगझीन नसलेले देशी बनावटीचे पिस्टल व एक ५०० रु. किंमतीचे जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात ३४७/२०२४, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि ताकभाते पुढील तपास करीत आहेत.