- आमदार महेश लांडगेंवर सुषमा अंधारेंची टीका…
- गिरीश महाजनांच्या भूमिकेवरही केला सवाल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर रविवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.
यावेळी शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख चेतन पवार उपस्थित होते.
त्या बोलताना म्हणाल्या,“काहींचा हिंदुत्ववाद हा ‘सिझनेबल’ आहे. धर्माचा वापर सोयीनुसार केला जातो. अँटनी लॉरा कंपनीकडून पैसा मिळत असेल, तर अशा दुर्घटनांवर बोलायचे नाही का?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“गिरीश महाजन यांना सत्तेत कशासाठी बसवले आहे? गोट्या खेळण्यासाठी का? त्यांना संकटमोचक म्हटले जाते; मग एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर ते कुठे आहेत?” अशा शब्दांत अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधला.
मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना सर्व ताकदीने लढणार असल्याचेही अंधारे यांनी स्पष्ट केले.

















