- लेवा संगिनी मंचच्या ‘बालगोपाल’ वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या मुलांना बक्षिसांच वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२४) :- गोकुळ अष्टमीनिमित्त पिंपरी चिंचवड लेवा संगिनी मंचच्या वतीने लेवा पाटील समाजातील मुलांसाठी ‘बालगोपाल’ वेशभूषा या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमास लेवा पाटीदार समाजासह सर्वच स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
चार वयोगटात विभागून बक्षीसांचे वितरण करण्यात आले. बक्षीसाचे मानकरी विराज चोपडे, देवांश खर्चे, जय पाटील, मधुलिका पाटील, देवांश इंगळे, देवांश बोरले, अरुण्या डहाके, साईशा कोल्हे, सान्वी कोलते, श्रीजा कोलते, अन्वी नारखेडे, मनस्वी खडसे हे विजेती मुलं ठरली.
विजेत्या मुलांना मार्गदर्शन करताना सुलभाताई उबाळे म्हणाल्या, मुलांनी अभ्यासासह अवांतर बाबीकडे लक्ष द्यावे. त्यात प्राविण्य कसे मिळवता येईल यासाठी सतत संघर्षशील रहावं. आज अभ्यासासह इतरही कौशल्यपूर्वक अभ्यासक्रम बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. त्याचेही अवलोकन करीत आधुनिक जगात मुलांनी स्वयंपूर्ण बनावं.
कार्यक्रमास शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, मा. नगरसेवक रवि लांडगे, पिंपरी चिंचवड भ्रातृमंडळ मंडळाच्या अध्यक्षा निना खर्चे, आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थानचे अध्यक्ष अमोल पाटील, नाना पाटील, गजानन लोखंडे आदी उपस्थित होते.
स्पर्धा संस्थेच्या आधारस्तंभ माया वराडे, माजी अध्यक्षा किरण पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाचे आयोजन लेवा संगिनी मंचच्या अध्यक्षा दिपाली नारखेडे, कार्यकारी सदस्या सुनिता इंगळे, रजनी बोंडे, वसुधा खर्चे यांनी तर, कार्यक्रमाचे नियोजन भ्रातृमंडळ उपाध्यक्ष नितीन बोंडे, संचालक संजय इंगळे, एम के नारखेडे यांनी केले.