- जीवे मारण्याची धमकी; चाकण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ३० ऑगस्ट २०२४) :- टी शर्ट दाखविण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून कापड व्यवसायिकाला अश्लील शिवीगाळ केली. ‘तू मला ओळखतो का? तुझे सगळे दुकान फोडून टाकेन, उद्यापासून मला हप्त्याचे पैसे चालू करायचे, नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यांच्या तोंडावर बुक्क्या मारल्या व कानाखाली देखील मारहाण केली. दुकानामध्ये असणारा स्टूल उचलून अंगावर मारण्यासाठी धावला. दुकानातील कामगाराला ‘तुला पण मारून टाकेन’ अशी धमकी दिली. त्यानंतर तो शिव्या देत पैशांची मागणी करून निघून गेला.
दरम्यान तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनला जात असताना ब्लॅक झोन हेअर अॅण्ड स्पा नावाच्या सलून दुकानाचे मालक हे देखील पोलीस स्टेशनला जात होते. त्यांनी घडलेला किस्सा त्यांना सांगितला. त्यांनीदेखील आरोपी दुकानामध्ये आल्याचे सांगितले. त्यांच्याकडून देखील हप्त्याची मागणी केली. ‘मला हफ्ते द्यायचे. संपूर्ण चौकातील दुकानांकडून मी हफ्ते घेणार आहे, असे म्हणून त्याने केस पकडून डोक्यामध्ये हाताने मारहाण केली, असा प्रकार व्यावसायिकाला सांगितला, असं फिर्यादीत फिर्यादी सुनिल नारायण गेहलोत (वय ३६ वर्षे, व्यवसाय कापड दुकान, महात्मा फुले चौक, चाकण) यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी आरोपी किरण कचर पवळे (वय २३ वर्षे रा महात्मा फुले चोक, चाकण) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात ५८६/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०८ (२), ३०८ (३), ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि बुरुड पुढील तपास करीत आहेत.