न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- यंदाच्या तीन दिवसीय (२५,२६,२७ ऑगस्ट २०२४) रावेत येथील इस्कॉन मंदिरातील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याकरिता पिंपरी चिंचवड शहर परिसर व उपनगरातून ७५ हजारपेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती दर्शवली.
त्याकरीता रावेत, निगडी वाहतूक पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सदस्य त्याचप्रमाणे तनपुरे फाऊंडेशनचे पोलीस मित्र, एसपीओ यांनी दर्शन बारी व्यवस्था त्याचप्रमाणे भाविकांची सुरक्षा व पार्किंग व्यवस्था याकरिता मंदिर व्यवस्थापनास सहकार्य केले. त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आज रोजी रावेत येथे ईस्कॉन मंदिर व्यवस्थापनाद्वारे भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र आहेरराव, इस्कॉन रावेत प्रमुख अध्यक्ष गौरांग दास, कार्यवाहक जयप्रकाश दास, प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या महिला विभाग प्रमुख कविता बेंडाळे, संपर्क राज्य प्रमुख विजय मुनोत,विभागीय अध्यक्ष सतिश देशमुख विशाल शेवाळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांची होती.
याप्रसंगी पो. निरीक्षक रुपाली बोबडे म्हणाल्या, ” सनातन धर्माची शिकवण भारत देशातील करोडो नागरिकांना अध्यात्माकडे आकर्षित करत आलेली आहे. भारतातील ही पुरातन संस्कृती जैसे थेच राहण्याकरिता ईस्कॉनसारखी संस्था देशात मोठे कार्य करीत आहे. सामाजिक बांधिलकी सोबत सेवाव्रत जपण्याचे कार्य संस्था अनेक वर्षांपासून करत आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील हे श्रीकृष्ण मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. गर्दीचे, वाहतुकीचे योग्य नियंत्रण व नियोजन करण्यासाठी पी एन एस के एस सारख्या संस्था पोलिसांना नेहमीच सहकार्य करीत असतात.
पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आहेर राव म्हणाले,” तीन दिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यास शहर परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असल्याने गर्दीवर योग्य नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस मित्र,एसपीओ यांनी बंदोबस्ताकरीता खूपच मोलाचे सहकार्य केले त्यांचे पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालायकडून विशेष आभार.
ईस्कॉन रावेत विभागाचे अध्यक्ष गौरांग दास प्रभुजी म्हणाले श्रीकृष्ण जन्मसोहळ्याकरिता पोलीस विभागातील कर्मचाऱ्यानसोबत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे एसपीओ , तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य ज्या ऊर्जेने तीन दिवस मंदिर प्रशासनास सहकार्य करत होते त्या कामास बघून आम्ही सर्व भारावून गेलो व त्यामुळेच आज हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला गेला.
प्राधिकरण नागरी सुरक्षा सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” कोरोना नंतरच्या काळापासून रावेत येथील श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या वर्षी जन्माष्टमी निमित्त धर्मराज चौक, भोंडवे चौक, सोनिगरा सीसायटी चौक आणि मंदिर परिसर या ठिकाणी संस्थेचे एसपीओ विजय मुनोत, बळीराम शेवते, रवींद्र पवार, नामदेव गाडे, सुभाष माने, तेजस सकट, राम सुर्वे, विशाल शेवाळे, सतिश देशमुख, राजू येळवंडे, लक्ष्मण इंगवले, राजेंद्र कुंवर, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, प्रतिभा कांबळे, सतीश मांडवे, रवींद्र जांभळे, देवजी सापरिया,संदीप कांबळे, संतोष चव्हाण,अभिषेक हांडे, निखिल कुमावत, अभिषेक जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिर प्रशासनाचे कार्यवाह जयप्रकाशजी दास यांनी केले.


















