न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिस दलातून शनिवारी एका सहायक पोलीस आयुक्तासह पाच अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय नीळकंठ, अँथोनी गोकावी, सहायक उपनिरीक्षक बाजीराव भुजबळ, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांचा समावेश आहे.
पोलीस सहआयुक्त डॉ. अविनाश महावरकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त माधुरी कागणे, निरीक्षक नितीन लांडगे उपस्थित होते.