- देहूगावातील नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- देहू ते तळवडे दरम्यान रस्त्यावरील दुतर्फा असणारे अतिक्रमण हटवावे आणि रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा देहूगाव ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
देहू-आळंदी राज्य महामार्गाची देखभाल आता महापालिका करीत आहे. सध्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली दिसत असून नैसर्गिक ओढ्यावर अनेक बांधकामे झाली आहेत.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शासनाने निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील अतिक्रमणे काढावीत आणि रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, नगर पंचायत प्रशासनाकडे केली गेली आहे.