न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- निगडीतील प्रभाग क्रमांक १३ आण्णाभाऊ साठे नगर येथील शौचालय नादुरुस्त आहे. त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे.
पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब दखल घेऊन त्वरित शौचालयाची दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा भक्ती शक्ती उद्यानासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.