न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- नादुरूस्त मशिनवर काम करीत असताना झालेल्या अपघातात एका कामगाराची तीन बोटे तुटली. हा अपघात आयएआय इंडस्ट्रीज, नाणेकरवाडी येथे २० फेब्रुवारी २०२४ रोजी घडला.
मंगेश गोविंद चौधरी (२०, रा. बालाजी नगर, गणेशनगर-१, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी आयएआय इंडस्ट्रीज कंपनीचे सुपरवायझर प्रभाकर सिन्हा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी मंगेश हे आयएआय इंडस्ट्रीज या कंपनीत सायंकाळी सात ते सकाळी सातच्या दरम्यान काम करीत होते. ते काम करीत असलेली फलेअरींग मशिन खराब होवून गरम झाली. फिर्यादी हे जॉबचा पाईप काढत असताना मशिनचे दोन्ही डाय जोरात फिर्यादीच्या हातावर पडले. या डायखाली फिर्यादीचा हात सापडला. या अपघातात फिर्यादी मंगेश यांच्या डाव्या हाताची करंगळी व शेजारील दोन बोटे अर्धी तुटली. या अपघातास सुपरवायझर प्रभाकर सिन्हा हे जबाबदार आहेत. सदर मशीन नादरुस्त झाली असून ती दुरुस्त करणे आवश्यक आहे, असे फिर्यादी यांनी अगोदर सांगितले होते. असे असतानाही आरोपी यांनी फिर्यादीस या मशीनवर काम करण्यास सांगितले व त्यामुळेच हा अपघात झाल्याचे मंगेश यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.