न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- पोलीस असल्याची बतावणी करुन दोन कोटी रुपयाच्या खंडणीसाठी हिंजवडी येथुन विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. याप्रकरणी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेने धाडसी कामगिरी करून डांबुन ठेवलेल्या विद्यार्थ्याची सुटका करीत ०२ आरोपीतांना अटक केली असून ८ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय. २६ वर्ष रा. मगर वस्ती खंडाळी गाव ता. माळशिरस जि. सोलापूर) याला खंडाळी गाव ता. माळशिरस जि. सोलापूर येथून व दुसरा आरोपी योगेश विश्वास सावंत (वय. ३४ वर्षे रा. दुसरा माळा जगदाळे बिल्डींग, राऊत नगर अकलूज, सोलापूर) यास अकलूज, सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे.
(दि. २९/०८/२०२४) रोजी जांबे येथील कोलते पाटील सोसायटीतून एका विद्यार्थ्यांचे अपहरण करुन, त्यास फलटण डांबून ठेवून, त्याचेकडुन ०२ कोटी रुपयेची खंडणीची मागणी करुन, पैसे न मिळाल्याने, त्याचेकडील सोन्याची चैन, दोन अंगठ्या व अॅपल वॉच काढून घेवुन, त्याला दिनांक ३०/०८/२०२४ रोजी पुणे पंढरपूर हायवेवर सोडून दिले. त्याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ९९९/२०२४ भान्यर्स कलम १४०(२).३०८ (४),३०८ (५),२०४,३ (५) अन्वये ०५ अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपीतांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळाजवळील तसेच टोलनाक्यावरील ७०-८० सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हे माळशिरस जि. सोलापूर येथील असल्याबाबत खात्री झाल्याने, पथकाकडील एक टीम माळशिरस सोलापूर येथे रवाना करण्यात आली होती.
पोउपनिरी सुनिल भदाणे व टीमने स्थानिक पोलीसांचे मदतीने, आरोपीकडे तपास केला असता, त्यांनी दाखल गुन्हा त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांनी गुन्हयात वापरलेली स्वीफ्ट कार व ०२ मोबाईल फोन असा एकुण ८,४०,०००/- किं रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानेश्वर घाडगे पोलीस रेकॉर्डवरील असून, त्याचेवर वेळापूर पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल असुन निष्पन्न आरोपीतांवर देखील खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत अॅट्रोसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.