न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- शहरामध्ये विविध धर्माच्या नावाखाली पैसे मागणाच्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये एखाद्या दहशतवादी संघटनेचा अतिरेकीदेखील भटक्याच्या वेशात दारोदार हिंडून शहराची रेकी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात फिरणा-या भटक्यांची कागदपत्रे तपासण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांनी स्थानिक पोलिसांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये परराज्यातील गुन्हेगार सापडण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिहार एटीएसने चाकणमधून एका दहशतवादी संघटनेचा संशयित अतिरकी ताब्यात घेतला आहे.
चाकण सारख्या वर्दळीच्या ठिकाणी संशयीत अतिरेकी असरा घेत असल्याने सुरक्षा यंत्रणांना मोठा हादरा बसला आहे. आंतरेकी संघटनाचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त पद्मनाभन यांनी शहरामध्ये भाड्याने राहणा-यांची माहिती संकलित करण्याचेही आदेश दिले आहेत.











