न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला. ऐश्वर्या बोत्रे (९४.८%), सुशांत साळुंके (९४,८%), जानवी देबडवार (९४:६) शाळेतील १६ विद्यार्थी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहे. यांनी शाळेत अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविले.
तर जानवी देबडवार व संजना पाटील यांनी संस्कृत विषयात तर जयश्री माळी हिने सोशल स्टडीज विषयात १०० पैकि १०० गुण मिळवून यश संपादन केले. शाळेचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, संचालिका स्मिता नायर-कुरुप, मुख्याध्यापिका क्षमा गर्गे यांनी अभिनंदन केले..











