न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील मोठे व छोटे अशा सर्व नाल्यांच्या सफाईचे काम १५ मेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार नाही, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
शहरात १३५ छोटे आणि ५७ मोठे असे १९२ नाले आहेत. या नाल्याची पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या मनुष्यबळाचा वापर करून सफाई करण्यास एप्रिल महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ह व क क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ८० ते ९० टक्के नालेसफाईचे काम झाले आहे.
तर उर्वरित ‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ई’, ‘फ ‘ व ‘ग’ या क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील नालेसफाईचे काम ५५ ते ७५ टक्के झाले आहे. या कामाची प्रभारी आयुक्त व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी मंगळवार (दि. ७) रोजी पाहणी केली आहे.











