न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- व्हिडिओ कॉल करून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्यात आले असून, या प्रकरणी सोमवारी (दि. ६) रोजी अनोळखी इसमावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सोमवारी दुपारी घरात असताना त्यांना व्हॉट्सअॅपवर एक अश्लील मेसेज आला. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असे असता, काही वेळाने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला.
फिर्यादी यांनी कॉल घेतला असता, आरोपीने त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. भेदरलेल्या महिलेने तत्काळ वाकड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलिस फौजदार मोमीन करीत आहेत.











