- पिंपरी कॅम्पात फसवणुकीचा प्रकार चव्हाट्यावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- दोघांनी आप-आपसात संगणमत करीत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. पिंपरी कॅम्पमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ६३६ चौ. फुट फ्लॅट मिळकतीवर एकुण ४६,००,०००/- रुपये बोजा तसेच सदर मिळकतीचा विक्की कुदनानी यांच्या सोबत केलेल्या व्यवहाराची बाब त्यांच्यापासून लपवुन ठेवली.
मिळकतीचा व्यवहार ठरवुन तक्रारदाराची दिशाभुल करुन मिळकतीच्या मोबदल्यात एकुण १०,७५,००० रुपये घेवुन दिलेल्या रकमेचा परस्पर अपहार केला. दिलेल्या रकमेची परतफेड मागितली असता तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि २९/०३/२०२२ ते दि १०/१०/२०२२) दरम्यान पिंपरीत घडला. ५४ वर्षीय फिर्यादीने आरोपी १) राहुल अशोक मोत्यानी *वय. ३६ वर्षे रा. एचबी १८/२, शनी मंदीरासमोर पिंपरी), महिला आरोपी (वय. ६५ वर्षे रा. एचबी १८/२, शनी मंदीरासमोर पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७८९/२०२४भा.दं.वि. कलम ४२०,४०६,५०६,५०४ माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) नुसार दोघांवर गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ याला अटक केली आहे. पोनि कापरे पुढील तपास करीत आहेत.











