- महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन..
- जमावाविरोधात कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- टोळक्याने महिला डॉक्टरला ‘पेशन्टला साप चावलेला असताना तुम्ही त्यास अॅम्ब्युलन्स दिली नाही’ असे म्हणत ओपीडीमध्ये धुमाकूळ घातला. रुग्ण तपासणी सुरु असताना ओपीडीचे कामकाज थांबवुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला.
आरोपी एकत्र येवुन बेकायदेशिर जमाव जमवुन तक्रारदार महिला डॉक्टरच्या अंगावर आले व मोठ मोठ्याने हातवारे करुन बोलुन आरडा ओरडा केला, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि ०४) रोजी सकाळी १०.४५ वाचे सुमारास खेड तालुक्यातील पाईट येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात घडला.
फिर्यादी महिला वैदयकिय अधिकारी यांनी आरोपी १) नवनाथ दरेकर (रा.पाईट ता. खेड जि.पुणे), २) प्रमोद माणिक खेगले (रा. पाईट ता. खेड जि.पुणे), ३) राजेंद्र बाबुराव पापळ (रा. पापळवाडी ता. खेड जि. पुणे), ४) विशाल शंकर केदारी (रा. पाळु ता. खेड जि.पुणे) व सोबतचे १० ते ११ इतर अनोळखी लोक यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६०६ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३२,१८९ (२),१९१ (२),३५२,३५१ (२), महा.पो.अधि.१९५१ चे कलम ३७ (१) (३),१३५ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.
















