न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२४) :- मामे भाऊ जेलमधुन जामिनावर सुटल्याने आणि त्याची तब्येत ठिक नसल्याने त्यांना भेटण्याकरीता बांधकाम व्यवसायिक तक्रारदार हिंजवडीतील गवारवाडी विठठल मंदिरासमोर बापुजी बुवा मंदिराजवळ दुचाकीवरून जात होते. दरम्यान आरोपीपैकी एकाने तक्रारदार यांना हात करुन थांबवले. दोघांनी त्यांना पकडले. त्यांच्या थोबाडीत मारली.
आरोपींच्या हातात कायते होते. त्यामुळे तक्रारदार जिव वाचण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळत असतांना कोणीतरी मागुन त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. घाबरुन जंगलात पळुन जात असताना त्यांना मोठ्याने फटाक्याचा आवाज आला, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०८) रोजी रात्री ०९.०० वा ते १०.०० वा दरम्यान उघडकीस आला.
याप्रकरणी विशाल प्रकाश देवकर (वय ३० वर्ष, धंदा बांधकाम व्यवसाय रा. घोटावडे ता. मुळशी जि.पुणे) यांनी आरोपी १) अक्षय साधु कापसे वय २९ वर्ष, २) मनोहर साधु कापसे वय ३५ वर्ष, ३) साधु कापसे रा. हिंजवडी ४) अमोल सुदाम धुमाळ ५) निलेश सुदाम धुमाळ रा. धुमाळवाडी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिजवडी पोलिसांनी १०३०/२०२४ भा.न्या. सहीता कलम १०९,१८९ (२),१९०, १९१(२), १९१ (३),१२७ (२),१२७ (२) सह कलम ४/२५ भा.ह.का., ३७ (१) (३) चे उल्लघन १३५ म.पो.का नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि झोल पुढील तपास करीत आहेत.


















