न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२४) :- एलोरा बिल्ड स्पेसेस या बांधकाम फर्ममध्ये तक्रारदार बांधकाम व्यवसायिकासह पाचजण डायरेक्टर होते. त्यांनी चिखली येथे बांधकाम प्रकल्प सुरु केला. सदर गृह प्रकल्पामध्ये १५० फ्लॅट व २३ दुकाने होती. सदरचा व्यवसाय हा भागीदारीमध्ये करण्याचे ठरले होते. त्यामध्ये तक्रारदार यांना ५ टक्के नफ्याचा वाटा ठरला होता.
दरम्यान सन २०११ ते २०१७ पर्यंत संस्थेचा आर्थिक व्यवहार तक्रारदारांसह आणखी दोघेजण पाहत होते. असे असताना प्रकल्पातील काही शॉप आणि फ्लॅटच्या विक्रीमधील कोणताही मोबदला तक्रारदार यांना दिला नाही. तक्रारदार यांच्या ना हरकत प्रमाणपत्राचा गैरवापर केला. आरोपी यांनी तक्रारदार यांची एकुण ५ ते ५.५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना सन २०१७ ते २०२३ च्या दरम्यान प्लॉट नं. १, २, ३, २०, २१, २२ चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर नक्षत्र फेज -२, चिखली येथे घडली.
फिर्यादी प्रदिप पोपटलाल कर्नावट (वय ५४ वर्ष, धंदा कंस्ट्रक्शन रा. शिवाजी पार्क चिंचवड) यांनी आरोपी १) प्रमोद भाईचंद्र रायसोनी, २. किरीट मावजी पटेल, ३. अमृतलाल कांजी निसार, ४. प्रशांत मणिलाल संघवी, ५. संदेश मिश्रीलाल चोपडा, (सर्व पुर्ण पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ५२०/२०२४ भादवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि खारगे तपास करीत आहेत.
















