न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- केंद्रीय कॅबिनेटने एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव आज स्वीकारल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. निवडणुकीसाठी होणारा खर्च, पोलीस बळाचा वेळ हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणालेत.
दोन टप्प्यात हे लागू होणार असल्याचंही ते म्हणालेत. एका टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या निवडणुकीनंतर100 दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुका होतील असंही वैष्णव म्हणालेत. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.