न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- बावधन पोलीस चौकी जवळील नर्सरीत धारदार हत्याराने झोपेत असतानाच अज्ञाताने गळा चिरून तरुणाचा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खून केला. प्रवीण महतो (वय २५) असं मयताचं नाव आहे.
दरम्यान आरोपी निष्पन्न झाला असून राजीव कुमार कुमार महतो असं त्याच नाव आहे. त्याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्याच्या एका जोडीदाराच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीला ताब्यात घेण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड व हिंजवडी पोलीस यांना यश आलेले असून पुढील तपास चालू आहे.