न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- कुदळवाडीत लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुले, महिला यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यासाठी स्वि. नगरसेवक दिनेश यादव यांनी प्रशासनास वारंवार स्मरणपत्रे देऊनही, कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून झालेली नाही. यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पुन्हा लेखी निवेदनांद्वारे कुदळवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, या परिसरात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कामगार वस्तीतील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी इतरत्र जावे लागते.
त्यामुळे आयुक्तांनी याची दखल घेऊन, महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्यासाठी कुदळवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची लवकरात लवकर उभारणी करावी, असे या पत्रात यादव यांनी म्हटले आहे.











