- पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सव यात्रा उत्साहात साजरी – नाना काटे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमिताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच राज्यस्तरीय कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. मुंजोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ”ग्रामदैवत मुंजोबा महाराज केसरी २०१९” या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढत पै विष्णू खोसे विरुद्ध पै. समीर देसाई यांच्यात लढत झाली. अवघ्या तीन मिनिटात पै. विष्णू खोसे याने पै समीर देसाई याला आसमान दाखवत चीतपट करून “मुंजोबा महाराज केसरी २०१९ किताब पटकावला.”
या उत्सवासाठी मुख्य मंदिरासह गावातील सर्वच मंदिरावर विविध रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर अनेक प्रकारच्या फुलांनी मुख्य मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता. सकाळी ७ वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता गावातील सर्व देवतांना ढोल ताशांच्या निनादात ग्रामस्थाच्या वतीने पानफुल वाहण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
रात्री श्री मुंजोबा महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली, टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात गाव प्रदक्षिणा घालत पालखी मिरवणूक मुख्य मंदिरात परत आली. या प्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. रात्री मनोरजनाचा कार्यक्रम मस्तानी महासंग्राम कार्यक्रम पार पडला. श्री मुंजोबा महाराज उत्सवानिमित्त मंगळवार (दि. ७ मे) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या सहाय्याने भव्य कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यात जिल्ह्यातील नामवंत अशा १०० मल्लांनी सहभाग घेतला.
यावेळी महिलांच्या कुस्त्याचे देखील आयोजन उत्सव कमिटीच्या वतीने केले होते. या आखाड्यात ” ग्रामदैवत मुंजोबा महाराज केसरी २०१९” हा किताब ठेवण्यात आला होता. यामध्ये १ लाख अकरा हजार रुपये रोख व चांदीची गदा असे बक्षिसाचे स्वरूप होते. ओम साई ग्रुप रहाटणी पिंपळे सौदागर यांच्या वतीने ८६ किलो वजनी गटात ”ओम साई किताब २०१९” ह्या किताबाचे आयोजन केले होते. यामध्ये चांदीची गदा व रोख २५ हजार रुपये रक्कम ठेवण्यात आली होती. या किताबासाठी पै. ऋषिकेश बालवडकर विरुद्ध व्यंकटेश बनकर यांच्यात लढत झाली. या झालेल्या लढतीमध्ये पै. ऋषिकेश बालवडकर याने १२ व्या मिनटात पै. व्यंकटेश बनकर याला चीतपट करत ”ओम साई किताब २०१९” हा किताब पटकावला. लक्षणीय व आकर्षक चितथरारक कुस्त्या पार पडल्या.
विजेत्या मल्लांना पोपट मारुती जगताप, पै. अर्जुन दत्तोबा काटे, तानाजी भगवंत काटे, सुरेश जयवंत काटे, सागर कृष्णा भिसे, वाल्मिक कुटे व ओम साई ग्रुप यांच्या वतीने ढाल देण्यात आल्या. या आखाड्यासाठी पंच म्हणून बाळासाहेब काळजे, सचिन खांदवे, निवृत्ती काकडे, संतोष माचुत्रे, काळुराम कवितके, विजय कुटे, किशोर नखाते तर हंगेश्वर धायगुडे यांनी उत्कृष्ठ निवेदक म्हणून कामगिरी पार पाडली. यावेळी महाराष्ट्र केसरी दशरथ आबा पवार, उपमहाराष्ट्र केसरी नाथा पारगावकर, गोविंद तात्या पवार, वस्ताद जयवंत कवितके, दत्तोबा नाणेकर, खंडू वाळूंज पै. संदीप कापसे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, छत्रपती पुरस्कार विजेते (कब्बडी) शंकर कृष्णाजी काटे, माजी नगरसेवक कैलासभाऊ थोपटे, माजी पीसीएमटी सभापती दिलीप बालवडकर, पोलीस पाटील भगवंत यशवंत काटे पाटील, वस्ताद पै. दामुआण्णा काटे, रघुनाथ (आबा) काटे, संदीप विठ्ठल काटे, विलास काटे, अण्णा घोटणे, उत्तम धनवटे, नंदू जगताप, महादेव काटे, राम कुंजीर, सुनील कुंजीर, कैलास कुंजीर, सागर काटे, ज्ञानेश्वर काटे, निलेश जगताप, भरत कुंजीर, जयवंत बोडके, राजू काटे, नंदकुमार काटे, चंद्रकांत भिसे, तानाजी पांढरे, अमोल काटे, चंद्रकांत कुटे, दिलीप धनवटे, सुनील (अण्णा) काटे, बाळासाहेब काटे, दिलीप काटे, प्रमोद काटे, चंदन काटे, जगनाथ काटे, संपत मेटे, मनोहर काटे, रितेश जगताप, मुरलीधर काटे, विजू काटे, दिगंबर जगताप, शिवाजी काटे, संदीप (आबा काटे, पंडित काटे, गुलाब काटे, गणेश हांडे, धीरेंद्र सेंगर, माचीन्द्र काटे, पै. आदित्य काटे पाटील, व परिसरातील विविध शेतंत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्व कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात लाभ घेतला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री मुंजोबा महाराज उत्सव कमिटी व अध्यक्ष विनायक अर्जुन काटे, समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले.











