न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या (दि. ९) रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती, राज्य वाहतूक विभागामार्फत देण्यात आली आहे.
दोन तासासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद राहणार असल्याने अनेकांचे हाल होणार आहेत. हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-४) ने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे.
वाहन चालकांनी याची नोंद घेवुन, महामार्ग पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे.











