न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पिंपळे सौदागर येथील जेष्ठ व आदर्श माता भीमाबाई पांडुरंग काटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ७६ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पिंपळे सौदागर येथील पी. के. स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे व उद्योजक सोमनाथ काटे यांच्या त्या मातोश्री होत.
तर नगरसेवक शत्रुघ्न काटे व पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे यांच्या त्या चुलती होत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण पिंपळे सौदागर परिसर शोक सागरात बुडाला आहे.















