न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले, महाराज सिध्दारुढ स्वामी, सामाजिक कार्यकर्ते अजय मुगडे, राजेंद्र परमाळे, उमाकांत शेटे, अंदाप्पा सकरगी, मारुती नागसाखरे, बाळासाहेब शेटे, मलय्या स्वामी, हावगी भुसारे, अनिल बोचरे, मारुती बोळगावे, सतिश सोनटक्के, केशव विभुते, चंद्रकांत कलशेटटी, बसवराज चेलगिरी, मंहतेश हरळय्या आदी उपस्थित होते.















