न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, औषध माहिती केंद्र (DIC), व केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रिक्ट तसेच सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी, यांच्या संयुक्त विद्यमाने जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “4th National Pharmacovigilance Week” 2024 (NPW) चे आयोजन सिद्धी फार्मसी कॉलेज,चिखली, पिंपरी चिंचवड येथे करण्यात आले.
प्राचार्य डॉ. प्रवीण साबळे यांनी विवेक तापकीर (एम.एस.पी.सी. समन्वयक, उपाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट) यांचे स्वागत केले आणि औषधांच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल फार्माकोव्हिजिलन्स आणि त्याची आवश्यकता याविषयी जागरूक करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे विषद केले.
प्राचार्य डॉ. प्रवीण साबळे यांनी रविंद्र पवार (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन) आणि संतोष वरे (ॲार्गनायझींग सेक्रेटरी , पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन), स्वेता थोरवे (महिला सदस्य केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट) तसेच झोनल लिडर स्वप्नील जंगम, संदीप सूर्यवंशी यांचे स्वागत केले आणि सिद्धी कॅालेज ऑफ फार्मसी ने राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह साजरा करण्याचा एक भाग म्हणून संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे विषद करून भविष्यातही असे संयुक्त उपक्रम आयोजित केले जातील, असे सांगितले.
विवेक तापकीर यांनी एडीआर रिपोर्टिंगच्या गरजेवर प्रबोधन केले. ते पुढे म्हणाले की फार्मासिस्ट आणि नवोदित फार्मासिस्ट यांना औषधांच्या सुरक्षित आणि प्रभावी वापरासाठी एडीआर रिपोर्टिंगबद्दल जागरूक करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
एम.एस.पी.सी.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी त्यांच्या ऑनलाइन व्हिडिओमध्ये भारताच्या फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्रामबद्दल आणि एडीआर रिपोर्टिंगच्या प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती दिली. एम.एस.पी.सी.ने या संदर्भात फार्मासिस्टना प्रशिक्षण देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचीही माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमास रविंद्र पवार, संतोष वरे, श्वेता थोरवे, स्वप्नील जंगम, संदीप सूर्यवंशी, प्राचार्य प्रवीण साबळे, प्रा. राजश्री निकम, प्रा. प्रणाली मॅडम, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि एडीआर आणि फार्माकोव्हिजिलन्सबद्दलच्या त्यांच्या शंका दूर केल्या. प्रा. प्रणाली यांनी सूत्र संचालन केले व प्रा. राजश्री निकम यांनी आभार मानले.
















