न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ८ मे २०१९) :- पिंपळे सौदागर येथील श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन येथे येणाऱ्या महिलांना टॉयलेट सेवा उपलब्ध नसल्याने, त्यांची कुटंबना होत असल्याचे निदर्शनास आले.
या समस्या लक्षात घेऊन नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत ई-टॉयलेट सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे परिसरातील अनेक महिलांनी या उपक्रमामुळे नगरसेवकांचे आभार मानले.
मोफत ई-टॉयलेट सुविधा सुरु करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली CSR फंड्स, Exid Industries Ltd आणि नगरसेवक शत्रुघ्न(बापु) काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या माध्यमातुन सुरु कऱण्यात आलेल्या या मोफत ई टॉयलेट सुविधेचे उद्घाटन अनिरुध्द सर (Exide बॅटरी चीफ मॅनेजर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एडमंड डीसिल्वा, नेम्हा गिध, शोभीत गुप्ता, अमित बाली, प्रतापसिंग, चेतन भुजबळ, हेमंत कोयते, गणेश झिंजुर्डे, निलेश कुंजीर, किरण काटे, कमलेश काटे, सुनील वाघमारे, भगतसिंग काटे आदी उपस्थित होते.
मोफत ई-टॉयलेट सुविधा देखभाल दुरूस्ती आणि साफसफाईची जबाबदारी चंद्ररंग डेव्हलपर्स आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी घेतली आहे.


















