न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२४) :- आकुर्डी, निगडी आणि सांगवी परिसरामध्ये एकूण २७ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आकुर्डी गुरुद्वारा येथे १५, निगडीमध्ये पाच आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हातात दांडके घेऊन चारचाकी वाहनांची तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. इतर आरोपींचा शोध सांगवी आणि निगडी पोलीस घेत आहेत.












