न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य महामार्ग (एसटी) महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड आगारातून नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तिपीठ दर्शनसाठी बस सोडण्यात येणार आहेत. भाविकांसाठी बसचे ‘ऑनलाइन अॅडव्हान्स बुकिंग’ सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
पिंपरी-चिंचवड आगारातून ५ ऑक्टोबरला साडेतीन शक्तिपीठांसाठी बस रवाना होणार आहेत. साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी एसटीचे २ हजार ७०० रुपये तिकीट असणार आहे. भाविकांना राहण्याचा, जेवण व दर्शन पासचा खर्च स्वतःला करावा लागणार आहे.
कोल्हापूरमधील दर्शन झाल्यानंतर बस तुळजापूरला जाईल. दुसऱ्या दिवशी (दि. ६) तुळजापूरहून माहूर येथे बसचा मुक्काम असणार आहे. तिसऱ्या दिवशी (दि. ७) नाशिक, वणी येथे दर्शन होईल. त्यानंतर बसचा पिंपरी-चिंचवडसाठी परतीचा प्रवास सुरू होईल. प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी केले आहे.
एसटीने नवरात्रामध्ये साडेतीन शक्तिपीठ दर्शनसाठी बस सोडण्यात येणार आहेत. तसेच गणशोत्सवामध्ये एसटीकडून अष्टविनायक दर्शनासाठी गाड्या सोडल्या होत्या. एसटीने गणशोत्सवामध्येही कोकणासाठी जादा गाड्याची सोय केली होती. त्यामुळे शहर परिसरात स्थायिक झालेल्या कोकणवासियांची सोय झाली होती. नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.













