न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- महाराष्ट्र शालेय क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विदयामाने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर च्या खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले. त्यामध्ये ‘यशवर्धन अगरवाल’ हा बुद्धिबळ या खेळात १९ वर्ष वयोगटत प्रथम आला असून लॉन टेनिस या खेळात कु. श्रेया रंजाळकर हिने दुसरा क्रमांक मिळवला.
शाळेचे संचालक संदीप काटे यांनी मोलाची साथ आणि शाळेच्या सर्व विकास कार्यात दिलेले मार्गदर्शन हे खेळाडूंच्या यशामध्ये महत्त्वाचे ठरले. शाळेच्या प्राचार्य सुविधा महाले यांच्या सतत प्रोत्साहन आणि योग्य दिशा यामुळे खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. याशिवाय या यशामागे खेळाडूंच्या कठोर परिश्रमा बरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक मयूर काळे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
शाळेच्या सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे खेळाडूंना स्पर्धेसाठी उत्तम तयारी करून दिली. या विजयामुळे चॅलेंजर पब्लिक स्कूल शाळेचे नाव उंचावले आहे आणि सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













