न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- रस्त्यावर उभ्या केलेल्या स्कूल बसला अचानक आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आली.
चिंचवड गावातील रस्टन कॉलनीसमोरील परिसरात पार्क केलेल्या स्कूल बसने (एमएच १२ केक्यू ३४६८) अचानक पेट घेतला. घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला कळताच निगडी-प्राधिकरण, वल्लभनगर आणि थेरगाव येथील या विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
आग लागल्यावर उष्णतेमुळे रबर गरम झाल्याने बस नॉनगेअर मोडमध्ये येऊन बस अचानक सुरू होऊन काही अंतर समोर गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण लक्षात आले नाही. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे स्कूल बसच्या फिटनेसचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.













