न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०१९) :- कुदळवाडीत लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुले, महिला यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यासाठी स्वि. नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे कुदळवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी केली होती.
या निवेदनाची आयुक्तांनी दखल घेतली असून, महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक पाठविले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. कर्पे व ईतर कर्मचारी यांनी आज गुरुवार (दि. ९) रोजी या ठिकाणी येऊन, जागेची पाहणी केली. तसेच लवकरात लवकर अहवाल तयार करून, तो प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले, असे यादव यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.











