न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०१९) :- काळेवाडी फाट्याकडुन पिंपरीकडे जाणाऱ्या रत्यालगतच्या चेंबरला तात्काळ झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख दत्ता गिरी यांनी ‘ग’ प्रभाग मुख्याधिकारी वर्षा झगडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काळेवाडी फाट्यावरून पिंपरीकडे जाणाऱ्या बिआरटी मार्गालगतच्या साईबाबा वजनकाट्याजवळ चेंबरची तात्काळ दुरूस्ती करून, झाकण बसवावे अन्यथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा या पत्रात त्यांनी दिला आहे.


















