न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- घटस्थापना व नवरात्रौत्सव मोठया उत्साहात व शांततेने पार पाडावा व कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे.
०१ पोलीस सह आयुक्त, ०१ अपर पोलीस आयुक्त, ०६ पोलीस उप आयुक्त, ९ सहायक पोलीस आयुक्त, ४८ पोलीस निरीक्षक, २१० सपोनि / पोउपनि, २०५० पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड, ०१ एसआरपीएफ कंपनी, ०२ बीडीडीएस पथक, ०५ आरसीपी, १७ स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त तसेच सकाळी व सायंकाळी महिला छेडछेडा होवू नये यासाठी ३४ दामीनी पथके कार्यरत राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन यांनी सर्व मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेतले असुन सदर बैठकामध्ये नवरात्रौत्सव हा उत्साहाने व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही त्या दृष्टीने सर्व सुचना देणेत आलेल्या आहेत. सर्व नागरीकांनी व मंडळाचे सदस्य, कार्यकर्त्यांनी सदर सुचनांचे पालन करावे याबाबत पोलीस आयुक्तांनी आवाहन केले आहे.













