- अहिल्यानगर नावाला केंद्र सरकारची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२४) :- अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर ( Ahilyanagar ) नावाने ओळखला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर ( Ahilyanagar ) असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावं बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.