न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२४) :- चिंचवडमधील विजय बिअर बार समोर मयत अमीर मकबुल खान (वय ३४ वर्षे रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) हा देशी दारुच्या दुकानात दारु विकत घेत काऊंटरजवळ थांबलेला होता. शेजारी एक अज्ञात इसम हा दारु पीत थांबलेला होता. अज्ञात इसमाने त्याचा दारूचा ग्लास तेथे बाजुला असलेल्या ती-हाइत इसमास प्यायला दिला. अज्ञात इसमाने त्याचा दारूचा उष्टा ग्लास ती-हाइत इसमास दिला. याचा अमीर खान यास राग आला. त्याने अज्ञात इसमास शिवीगाळ करून चप्पलेने मारले.
तेव्हा सदरचा अज्ञात इसम दुकानाच्या बाहेर गेला व त्याच्या मागे अमीर खान हा देखील बाहेर गेला. दुकानाच्या बाहेर त्यांचेत पुन्हा हाणामारी चालु झाली. तेव्हा अमीर खानने अज्ञात इसमास वीट फेकून मारली. त्यामुळे चिडून जावून अज्ञात इसमाने त्याच्याकडील स्कु ड्रायव्हर अमीर खान याच्या छातीत खुपसून त्याचा खुन केला व पसार झाला. या प्रकरणी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणेत आला. हा प्रकार (दि.०६) रोजी रात्री ९.४५ वा चे सुमारास घडला.
पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामधुन एका संशयीत इसमाचे गुन्हयाचे ठिकाणच्या हालचालीवरुन त्यानेच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. साक्षीदारामार्फत त्याच्याबाबत सविस्तर माहीती प्राप्त करत असताना इसमाचे नाव यशवंत आत्माराम बगाडे (वय ४२ वर्षे रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असल्याचे निष्पन्न झाले. तदनंतर रात्री दरम्यान तपास पथकचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन टिम तयार करून आरोपीचा चिंचवडेनगर व दळवीनगर भागात तांत्रीक पध्दतीने शोध घेवून १२ तासाच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.












