न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १७ ऑक्टोबर २०२४) :- ‘चाकण एमआयडीसीत व्यावसाय करायचा असेल तर, महिन्याला १ लाख १० हजार रूपये हप्ता द्यायचा, नाहीतर तुमची विकेट टाकू’, अशी धमकी फोनवरून देत खंडणी मागण्याचा प्रकार (दि. १६) रोजी दुपारी ११.५२ वा. च्या सुमारास वाघजाई नगर येथे घडला आहे.
याप्रकरणी अमोल दामोदर शेडगे (वय ३५ वर्षे वाघजाई नगर, खराबवाडी) यांनी आरोपी प्रदिप ऊर्फ गोटया पडवळ (वय ३१ वर्षे रा. आंबेठाण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी ६९६/२०२४ भरतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०८(४),३५२, ३५१ (२) प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउनि मुल्ला पुढील तपास करीत आहेत.












