न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२४) :- वाल्हेकरवाडीतील रुममध्ये महिला एकटीच होती. त्यावेळी तिच्या प्रियकराने अज्ञात कारणावरुन रुममधील उशीच्या साह्याने तिचे तोंड दाबुन अज्ञात हत्यार तिच्या पोटात भोसकुन तिचा खुन केला आहे.
ही घटना (दि. १६) रोजी सकाळी १०.३० वा. ते दुपारी ०३.०० वा.च्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी महिला फिर्यादीने आरोपी साहिल (पुर्णनाव माहित नाही रा. यमगरनी, ता. निपाणी जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिंचवड पोलिसांनी ४१४/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि कोळू पुढील तपास करीत आहेत.












