न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२४) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा दिवस” साजरा करण्यात आला.
शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, निशा पवार ,भावना देवरे, प्रज्ञा शिरोडकर गीतांजली दुबे,हेमा सिंग यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार यांनी डॉ. कलाम यांचा ‘स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडते, तर खरे स्वप्न ते असते जे तुम्हाला झोपूच देत नाही, हा विचार सांगून विद्यार्थ्यांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे सांगितले. उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन आपल्या प्रशालेतील एक तरी विद्यार्थी त्यांच्यासारखा महान वैज्ञानिक व्हावा, अशी आशा व्यक्त केली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध पुस्तकांचे वाचन घेण्यात आले.
यावेळी शाळेच्या दर्शनी भागात वाचन प्रेरणा दिनाचे भित्तीपत्रक लावण्यात आले होते. मुलांना वाचन कट्टा, पुस्तकपेढी, पुस्तक वाचन संकल्प, पुस्तकाचे प्रदर्शन या संदर्भात मान्यवरांनी मागर्दर्शन केले. वाचन स्पर्धा व विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी मध्ये उर्मिला ठोंबरे, प्रज्ञा शिरोडकर, रेणू राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुलांना जेवण्याच्या आधी व काहीही गोष्टी खाण्या अगोदर स्वच्छ हात धुणे, शौचालयाला गेल्यानंतर, खोकला जोरात आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे आदींबाबत मागर्दर्शन करण्यात आले. यामुळे मलेरिया, कावीळ व डेग्यू यासारखे आजार न होण्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. संविधानातील प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिंपल काळे यांनी केले. तर, आभार दिव्य सराफ यांनी मानले.