न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- भंडारा-गोंदीयातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी पाठवीला होता.
मावळ लोकसभेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी, मावळगड राखण्यासाठी तसेच या मतदारसंघातून मतदान गोळा करण्यासाठी वेळ मिळत नसल्या कारणाने त्यांनी तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदासंघाच्या संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.
परंतु, युवराज दाखले यांचा राजीनाम पक्षश्रेष्ठींनी नाकारला असून, तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदीच कार्यरत राहण्याच्या सूचना त्यांना शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक तथा मा. आमदार अरविंद नेहरकर यांनी दिल्या आहेत. तसेच लोकसभेत या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला झालेल्या मतदानाचा आढावा तसेच सक्रीय पदाधिकारी यांचा लेखाजोखा तसेच निष्क्रिय पदाधिकारी यांच्या संदर्भात तात्काळ अहवाल देण्याचा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे.











